Close

Ayushman Bharat Pradhanmantri Jan Arogya Yojna

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान कार्ड ई-केवायसी

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

तसेच १२ अंकी शिधापत्रिका (राशन कार्ड) आयडी तपासणीसाठी व पडताळणीसाठी आपण https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

बेनिफिशिअरी लॉगिन चा वापर करून तुम्ही स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता

Google Play स्टोर मधून Ayushyaman App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा —

Ayushman App National Health Authority

आयुष्मान अँप (Ayushman app) डाउनलोड व लॉगईन करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता

https://www.youtube.com/watch?v=RhiNP1Uw_DM&list=PLYcj0BpCoCc7CBFxCMJo2Ms2iKypz5kAw&index=3

आयुष्मान कार्ड ई केवायसी प्रक्रिया आणि आयुष्मान कार्ड डाउनलोड प्रक्रिया जाणण्यासाठी खालील वेबलिंक वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता :

https://www.youtube.com/watch?v=3MrCt360JS0&list=PLYcj0BpCoCc7CBFxCMJo2Ms2iKypz5kAw&index=4

आपले नाव यादीत असल्यास राशन कार्ड, आधार कार्ड व आधार संलग्नित मोबाईल क्रमांकसह आपण आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र चालक, आपल्या जवळील कॉमन सर्विस सेन्टर(CSC) (महा ई-सेवा केंद्र), स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन आपले आयुष्मान कार्ड – ई-केवायसी मोफत करून घेऊ शकता. यासाठी कोणतेही शुल्क आपणास अदा करण्याची गरज नाही.