Close

कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Publish Date : 08/07/2022

औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत बुस्टर डोस घेण्याची सुविधा केंद्र सरकारच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. दुसऱ्या डोसनंतर सहामहिने झालेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

            कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सहा महिन्यांनी पात्र असलेल्यांना लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य,  उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, डॉ.लड्डा, डॉ. प्रेरणा संकलेजा यांच्यासह महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

            नागरिकांना शासकीय रुग्णालये, महानगरपालिका आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण उपलब्ध असून सहा महिन्यापूर्वी कोरोना लस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घ्यावा तसेच दुसरा डोस आतापर्यंत घेतला नसल्यास तातडीने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. कॉर्बेव्हॅक्स, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या तीनही लसीची उपलब्धता असल्याने लसीकरण करुन घेण्याचे यांनी सांगितले.

औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत बुस्टर डोस घेण्याची सुविधा केंद्र सरकारच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. दुसऱ्या डोसनंतर सहामहिने झालेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सहा महिन्यांनी पात्र असलेल्यांना लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, डॉ.लड्डा, डॉ. प्रेरणा संकलेजा यांच्यासह महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना शासकीय रुग्णालये, महानगरपालिका आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण उपलब्ध असून सहा महिन्यापूर्वी कोरोना लस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घ्यावा तसेच दुसरा डोस आतापर्यंत घेतला नसल्यास तातडीने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. कॉर्बेव्हॅक्स, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या तीनही लसीची उपलब्धता असल्याने लसीकरण करुन घेण्याचे यांनी सांगितले.