सवलतीचे अतिरिक्त गुण प्रस्तावास मुदतवाढ
प्रकाशन दिनांक : 05/02/2019
औरंगाबाद, दि. ४ (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे संलग्ण असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सुचित करण्यात येते की, शासन निर्णय दि. २४ नोव्हेंबर २०१७ नुसार शास्त्रीस कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ जानेवारी २०१९ पर्यंत देण्यात आली होती.
शासनाने दि. ३१ जानेवारी २०१९ रोजीच्या पत्रान्वये शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. ५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. ५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सादर करावयाचे आहेत.
तरी मार्च २०१९ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (१० वी) प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी , पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा यांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळाप्रमुखांनी दक्षता घ्यावी , असे सचिव राज्यमंडळ, पुणे-०४ यांनी कळविले आहे.