बंद

बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणासमोर  औरंगाबाद खंडपीठात 17 व 18 रोजी सुनावणी

प्रकाशन दिनांक : 14/05/2019

औरंगाबाद, दि.10 (जिमाका) :- सिमी संघटनेच्या बंदीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक), न्यायाधिकरणाचा दौरा दिनांक 17 व 18 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत या प्रकरणी सुनावणी होणार असून न्यायाधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता दिनांक 16 मे रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या कालावधीत सिमी संघटनेच्या बंदीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी होणार असून तपासी अधिकाऱ्यांच्या साक्ष होणार आहे.

            ॲडिशनल सॉलीसिटर जनरल श्रीमती पिंकी आनंद आणि वरिष्ठ वकील विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे दिनांक 17 व 18 मे रोजी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांच्या समक्ष होणार आहे. सुनावणीचे कामकाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कोर्ट हॉल क्रमांक 9 येथे दिनांक 17 व 18 रोजी सकाळी 10 पासून सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.

*****