बंद

कसे पोहोचाल?

विमानाद्वारे:

शहराच्या पूर्वेला सुमारे १० किलोमीटर अंतरावर स्थित चिकलठाणा येथे छत्रपती संभाजीनगर विमानतळ हे विमानतळ आहे आणि हैदराबाद, दिल्ली, उदयपुर, मुंबई, जयपूर, पुणे, नागपूर, इंदूर येथून उड्डाणे आहेत. हज यात्रेसाठी प्रवास करण्यारा लोकांसाठी अलीकडेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

आगगाडीने :

छत्रपती संभाजीनगर स्टेशन (स्टेशन कोड: एडब्ल्यूबी) भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागातील सिकंदराबाद-मनमाड विभागावर स्थित आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबई, दिल्ली, हैदराबादसह रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. ते नांदेड, परळी, नागपूर, निजामाबाद, नाशिक, पुणे, कुरनूल, रेनिगुंटा, इरोड, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, नरसापूर येथेही जोडलेले आहे.

बसने :

छत्रपती संभाजीनगर देशाच्या सर्व भागांना राष्ट्रीय महामार्ग आणि राजमार्गांनी चांगले जोडलेले आहे. धुळे ते सोलापूर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग २११ शहरामधून जातो. छत्रपती संभाजीनगरकडे जालना, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, बीड, मुंबई वगैरे जोडणी आहे. महामार्ग जोडणी अजिंठा आणि एलोरा या जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना अतिशय आरामदायक करते.