बंद

विद्यापीठातील ॲथलेटिक ट्रॅक सिंथेटिक करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

प्रकाशन दिनांक : 19/02/2022

औरंगाबाद,दि. 18 :- (विमाका) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातीचा ॲथलेटिक ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक करण्याकरीता ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद शहरातील खेळाडू सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, माजी महापौर भगवान घडामोडे, ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांची उपस्थिती होती.

क्रिकेट, देशी क्रिडा खेळ आणि ॲथलेटिक्स या खेळांकरीता खासदार चषक स्पर्धा घेण्यात येणार असून याकरीता समिती स्थापन करण्याच्या सूचना श्री.कराड यांनी दिल्या. तसेच  गंगापूर क्रिडा संकुलासाठी केंद्राकडून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.