बंद

लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा- जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 22/04/2019

औरंगाबाद- दि 21 (जि मा का) लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे  गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. 

क्रांती चौक येथे  आयोजित मतदान जागरूकता सायक्लोथॉन  उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आयोजित RIDE FOR DEMOCRACY या  सायक्लोथॉनमध्ये सुमारे 60 जणांनी सहभाग नोंदवला. 

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ रविंद्र सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी झेंडा दाखवून मरेथॉनला प्रारंभ केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, निवडणूक नायब तहसीलदार सिद्धार्थ धनंजकरआदी उपस्थित होते.

शहरातील ‘ब्लॅक बडस्’ या सामाजिक संस्थेने या सायक्लोथॉनमध्ये पुढाकार घेतला. ही सायक्लोथॉन 10 की.मी एवढ्या अंतराची आयोजित करण्यात आली होती. 

क्रांती चौक पासून सुरू झालेल्या मॅरेथॉनचा प्रवास सिडको बसस्टँड, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, अमखास मैदान पासून ते पुन्हा क्रांती चौक असा होता. सायक्लोथॉनच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांना सहभागाबद्दल प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

*****

लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा - जिल्हाधिकारी उदय चौधरी