ग्रामीण भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 27/12/2021
औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत 9 जानेवारी 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.