ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
प्रकाशन दिनांक : 25/11/2021
औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): निवडणूक कार्यक्रमानुसार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी परिशिष्ट अ व ब नुसार दिलेल्या तसेच संपूर्ण निवडणूक कार्यक्रम बारकाईने वाचन, अवलोकन करुन सदर निवडणूक कार्यक्रमानुसार टप्पेनिहाय वेळोवेळी अचूक कार्यवाही करण्यात यावी व टप्पेनिहाय केलेल्या कार्यवाही बाबतचा अनुपालन अहवाल त्या त्या दिवशीच न चुकता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबतची दक्षता घेण्यात यावी. सदर प्रकरणी निवडणूक कामात झालेली चुक अक्षम्य असेल याची गंभीरतेने नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहेत.
निवडणूक कार्यक्रमातील परिशिष्ट अ नुसार या पोट निवडणूकीमध्ये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकाकरिता पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबविण्याबाबत निर्देशित केलेले आहे.
ग्रामपंचायातीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम
अ.क्र. |
निवडणूकीचे टप्पे |
दिनांक |
1. |
नागरिकांच्या मागसवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक |
दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) पर्यंत |
2. |
तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक |
दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) |
3. |
नामनिर्देशनप्रत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) |
दिनांक 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते दिनांक 06 डिसेंबर 2021 (सोमवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 |
4. |
नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) |
दिनांक 07 डिसेंबर 2021 (मंगळवार) दुपारी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. |
5. |
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) |
दिनांक 09 डिसेंबर 2021 (गुरुवार) दुपारी 03.00 वा.पर्यंत |
6. |
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ |
दिनांक 09 डिसेंबर 2021 गुरुवार दुपारी 03.00 वा.नंतर |
7. |
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक |
दिनांक 21 डिसेंबर 2021 (मंगळवार) सकाळी 7.30 वा.पासून ते सायं.5.30 वा.पर्यंत |
8. |
मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) |
दिनांक 22 डिसेंबर 2021 (बुधवार) |
9. |
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक |
दिनांक 27 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत |
औरंगाबाद जिल्ह्यातील पोटनिवडणूकाबाबतचा तपशील (पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम)
अ.क्र. |
तालुका |
पोट निवडणूका लावलेल्या ग्रामपंचयातीची संख्या |
रिक्त पदाची संख्या |
1. |
औरंगाबाद |
20 |
26 |
2 |
पैठण |
14 |
17 |
3 |
फुलंब्री |
14 |
20 |
4 |
वैजापूर |
22 |
29 |
5 |
गंगापूर |
16 |
20 |
6 |
कन्नड |
16 |
21 |
7 |
खुलताबाद |
11 |
19 |
8 |
सिल्लोड |
09 |
21 |
9 |
सोयगाव |
06 |
12 |
एकूण |
128 |
185 |