बंद

आठवडी बाजार मतदानामुळे इतर दिवशी भरवण्यास परवानगी

प्रकाशन दिनांक : 20/04/2019

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) –  औरंगाबाद लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील भरवण्यात येणारे 22 ठिकाणचे आठवडी बाजार बंद किंवा पुढे ढकलण्यास अथवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटले आहे.

आठवडी बाजारांमुळे संबंधित ठिकाणी मतदानात अडचण येण्याची शक्यता आहे. भरवण्यात येणाऱ्या बाजारांमध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर, शेलगाव, पिशोर, सिल्लोडमधील रेलगाव, हट्टी, पोलोद, पिंपळदरी, मंगरूळ, फुलंब्री तालुका, पैठण तालुक्यातील विहामांडवा, ढोरकीन, आडूळ, लोहगाव, औरंगाबाद तालुक्यातील मिटमिटा, गंगापूर तालुक्यातील कायगाव, सिद्धनाथ वाडगाव, दिघी, टाकळी कदीम, सोयगाव तालुक्यातील सोयगाव, गोदेगाव आणि वैजापूरमधील मनूर, धोंदलगाव या गावांचा समावेश आहे.

या आठवडी बाजारांबाबत प्रशासनाने आठवडी बाजार बंद किंवा पुढे ढकलण्यास अथवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी दिली असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.

*****