बंद

सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीकरीता सभेचे आयोजन

प्रकाशन दिनांक : 01/12/2020

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 08 डिसेंबर 2020 रोजी सभेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आलेले आहे.

सभेच्या आयोजनाच्या वेळी कोरोना कोव्हीड-19 संबधाने सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनवर्सन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य विषयक सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे(सॅनिटाझरचा वापर करणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे, मास्कचा वापर करणे) असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे