बंद

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार सुनील केंद्रेकर यांनी स्वीकारला

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

 औरंगाबाद, दि. 11 (जि.मा.का.)– औरंगाबाद विभागीय आयुक्त पदाचा पदभार सुनील केंद्रेकर (भा.प्र.से) यांनी आज येथे स्वीकारला.

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्याकडुन सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबादेत सिडकोचे प्रशासकीय अधिकारी तसेच मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच बीड जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कृषी आयुक्त पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला असून क्रिडा आयुक्त पदी कार्यरत असताना त्यांची नियुक्ती औरंगाबाद विभागात विभागीय आयुक्त पदी करण्यात आलेली आहे.

यावेळी अपर आयुक्त डॉ.विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकूर, श्रीमती सरिता सुत्रावे, साधना सुरडकर, उपायुक्त सर्वश्री सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, श्री.पाटोदकर, माहिती संचालक यशवंत भंडारे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार सुनील केंद्रेकर यांनी स्वीकारला