बंद

वस्त्रोद्योग घटकांच्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या https://www.dirtexmah/gov.in या वेबसाईटवर दिनांक 31 जानेवारीपर्यंत आवेदन करण्यासाठी मुदत दिली होती. त्यात वाढ करून आता दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात येते आहे. तरी वस्त्रोद्योग घटकांनी सामान्य नोंदणी व वीजदर सवलतीचे आवेदन वाढीव मुदतीत करावे, असे आवाहन संचालक डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले आहे.