बंद

गोपनीय अहवालासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात कॅम्प

प्रकाशन दिनांक : 14/05/2019

            औरंगाबाद, (जिमाका) दि.10 – औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेले कार्यालयातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सन 2018-2019 या वर्षाचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन कॅम्प जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथील सभागृहामध्ये दिनांक 11 व 12 आणि 25 व 26 मे रोजी सकाळी 10 ते 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कॅम्प सुरळीतपणे पार पाडण्यासाठी औरंगाबाद जिल्हा महसूल आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती कॅम्प प्रमुख यांना शासन निर्णयातील निर्देशानुसार सर्व प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकारी यांना  यथोचित मार्गदर्शन करण्यात यावे व हजर असलेल्या अधिकारी यांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच संबंधित प्रतिवेदन, पुनर्विलोकन अधिकारी यांचेकडून प्रतिवदन, पुनर्विलोकन करावयाचे व केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची गट-अ,ब,क,ड निहाय माहिती संकलित माहिती घेण्यात यावी.

नियुक्त अधिकारी कंसात कॅम्पमधील पद.

 संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (पुनर्विलोकन कॅम्प सहाय्यक प्रमुख),राजीव शिंदे, तहसिलदार, सामान्य प्रशासन,  जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद  (प्रतिवेदन कॅम्प सहाय्यक प्रमुख), एन.पी. पवार, नायब तहसिलदार, प्रतिनियुक्तीने भुसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद  (कॅम्प सहाय्यक प्रमुख यांचे सहप्रमुख), श्रीमती पल्लवी लिगदे, ना. त. जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (कॅम्प सहाय्यक प्रमुख यांचे सहप्रमुख),  हरीश्चंद्र वलेकर, अ.का. पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (कॅम्प सहाय्यक यांचे सहायक), विजय पवार, लिपीक, (गृहशाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (कॅम्प सहप्रमुख यांचे सहायक) , अमोल राऊत, लिपीक, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (कॅम्प सहप्रमुख यांचे सहायक), बाबुराव सोनवणे, शिपाई, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (शिपाई), एम.बी. भालेराव, गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (शिपाई), अर्जन लुटे, शिपाई आस्थापना शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद (शिपाई), अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

*****