बंद

अचूक मतपत्रिका निर्गमित केल्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

प्रकाशन दिनांक : 14/05/2019

            औरंगाबाद, (जिमाका) दि.10 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमातुन व काही संघटनाच्या माध्यमातुन EDC व टपाली मतपत्रिका प्राप्त झाले नसल्याचे तक्रारी विविध वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

            सदर प्रकरणात वस्तुस्थिती पुढील प्रमाणे मांडण्यात येत आहे. या कार्यालयाकडून सर्व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडुन निवडणुक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण दरम्यान फॉर्म 12/12 ए भरुन घेण्यात आले. प्राप्त अर्जापैकी परिपूर्ण व अचूक प्रकरणांमध्ये EDC व टपाली मतपत्रिका निर्गमित करण्यात आल्या. त्यापैकी EDC 5595 व पोस्टल बॅलेट 4775 एवढे वाटप करण्यात आलेले असून आज रोजी 1558 टपाली मतपत्रिका मत नोंदवून या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच टपाल कार्यालयाव्दारे काही विलंब होत असल्यास त्याबाबत आढावा घेवुन उचित कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांनी जनतेस आवाहन केले आहे.

*****