बंद

शिकाऊ, पक्क्या अनुज्ञप्तीचे कामकाज शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु

प्रकाशन दिनांक : 18/09/2020

औरंगाबाद, दि. 18 (जिमाका):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माहे मार्च 2020 पासून आर. टी. ओ. कार्यालय कार्यालयाचे बहुतांशी कामकाज बंद होते. 22 जून पासून ऑनलाईन आगाऊ अपॉन्टमेंट घेऊन मर्यादीत स्वरुपात कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. परंतु शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्ती साठी आगाऊ ऑनलाईन अपॉन्टमेंट ही साधारणत: तीन आठवड्यानंतरची मिळत आहे. सदर कामकाजाची प्रलंबितता कमी करणे व अर्जदारांना लवकरात लवकर ऑनलाईन अपॉन्टमेंट मिळण्यासाठी  19 व 20 सप्टेंबर रोजी शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे कामकाज चालू ठेवण्याचा निर्णय कार्यालयाने घेतलेला आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी इच्छुक असणाऱ्या तसेच लॉकडाऊन कालावधीत शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपलेल्या सर्व अर्जदारांनी त्यांच्या सोईनुसार 19 व 20 सप्टेंबर रोजीची आगाऊ ऑनलाईन अपॉईमेंट घेऊन शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी पूर्ण कागदपत्रासह आर. टी. ओ. कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ, औरंगाबाद येथे व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी आर. टी. ओ. कार्यालय, मौजे करोडी, शरणापूरफाटा येथे वेळेवर उपस्थित रहावे.

          शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी चाचणीसाठी येतांना सक्तीने चेहऱ्यावर मास्‍क परिधान करावा. तसेच सॅनिटायझरचा वापर करावा व चाचणीच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचे (सोशल डिस्टंसिंग) पालन करावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी  संजय मेत्रेवार यांनी आवाहन केले आहे.