बंद

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी दिलेल्या परवानग्या रद्द

प्रकाशन दिनांक : 01/03/2021

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) :  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्रीराम ए. सोन्ने, अवसायक, देवगिरी सहकारी साखर कारखाना लि.फुलंब्री जि.औरंगाबाद, मा. प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद, कार्यकारी संचालक, दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. औरंगाबाद, मुख्य कार्यालय औरंगाबाद, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकविकास नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद, एम. के. इव्हेंट ॲण्ड मॅनेजमेंट कन्नड ता. कन्नड जि. औरंगाबाद, जुगलकिशोर तापडिया श्री. महेश अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक, औरंगाबाद लि.औरंगाबाद, बँक व सहकारी संस्था व इतर कार्यालये यांना वार्षिक सर्वसाधारण सभा व इतर कार्यक्रम घेण्यासाठी कोविड-19 च्या अनुषंगाने अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती.

परंतु सध्या महाराष्ट्रात व औरंगाबाद जिल्ह्यात कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवून संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलेल्या परवानग्या या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.