बंद

प्रकाशन दिनांक : 18/06/2019

औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका)- घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखडयातील पहिल्या टप्प्याच्या कामाच्या निविदा आचारसंहितेपूर्वी प्रसिध्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली  यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, वास्तुविशारद श्री. देशपांडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, विकास आराखडयातील पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन केंद्राचे काम सुरु होताना पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जल प्रधिकरणाने तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटन विभागाच्या जागेतील असणाऱ्या रस्त्यांच्या परवानगीसाठी पर्यटन विभागाने तत्पर कार्यवाही करावी. असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले की, या भव्य अशा पर्यटन केंद्रतील वास्तूशिल्पे जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून बनविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

*****

घृष्णेश्वर विकास आराखडयातील निविदा आचारसंहितेपूर्वी प्रसिध्द कराव्यात - जिल्हाधिकारी उदय चौधरी