बंद

144 कलम 31 मार्चपर्यंत लागू

प्रकाशन दिनांक : 03/03/2021

औरंगाबाद, दि.02, (जिमाका) :- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) या कार्यालयाच्या या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे 31 मार्च 2021 चे 24.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहील, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी कळविले आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महानगर पालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगर पालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगर पालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.

सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.द.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करण्यात येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.