रेशनकार्ड धारकांना आधार सिडींग करुन घ्यावे – जिल्हा पुरवठा अधिकारी
प्रकाशन दिनांक : 17/06/2022
औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना epos मशीनद्वारे अन्न वाटप करण्यात येते. त्या अनुषंगाने शिधापत्रिका आरसीएमएस वर ऑनलाईन करुन त्यांचे आधारसिडींग पात्र लाभार्थांन अन्न धान्य वाटप करण्यात येत, उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सिडींग पूर्ण झाल्यानंतर ज्या लाभार्थीं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अन्न धान्याचा लाभ घेऊ ईच्छितात परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही किंवा आधारसाठी नोंदणी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या दि. 23 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेनूसार अधार क्रमांक सादर करण्यासाठी किंवा आधार नोंदणी करण्या करीता 30 जून 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
जे लाभार्थी विहित मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांच्याकडून मतदान ओळख पत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, प्रधिकृत अधिकऱ्यांने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रित अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवासी पत्ता असणारे (नाव व फोटोसहीत) किसन फोटो पासबुक या कागदपत्राची पडताळणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना आपल्या कुटूंबातील ज्या सदस्यांचे आधार कार्ड नोंदणी बाकी आहे. त्यांनी त्वरीत रेशन दुकानदार किंवा तहसिल कार्यालयात जाऊन आधार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्षाराणी भोसले यांनी केला आहे.