बंद

भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण

प्रकाशन दिनांक : 15/08/2021

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते विभागीय आयुक्तालयात मुख्य ध्वजारोहण

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालममंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन नागरिकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO/ या फेसबुक पेज, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) व युट्यूबवर MCN NEWS चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.