बंद

पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

प्रकाशन दिनांक : 25/06/2019

योगदिन

#आंतरराष्ट्रीययोगदिन यानिमित्त योग विद्येचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आज विभागीय क्रीडा संकुलात योगसाधना करण्यात आली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदी उपस्थित होते

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : संयुक्त राष्ट्रसंघाने “21 जुन” हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणुन घोषित केलेला आहे. 5000 वर्षाहून अधिक पंरपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभुत आहे. करीता योग विद्येचा प्रचार व प्रसार करण्याकरीता आज दिनांक 21 जुन रोजी सकाळी 7.00 वा. इन्डोअर हॉल, विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे यशस्वी आयोजन करण्यात आले.

श्री.वेदपाठक गुरुजी, श्री. राम बारस्कर,श्री. उदय काहाळेकर, श्रीमती आरती पॉल, श्रीमती कांचन वसेकर यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमास  नंदकुमार घोडोले, महापौर,  चिरंजीव प्रसार, पोलीस आयुक्त, उदय चौधरी, जिल्हाधिकारी,  संजीव जाधवर निवासी उपजिल्हाधिकारी,  श्रीमती रीता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी, विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी, रमेश मुंडलोड, तहसिलदार, सतीश सोनी, तहसीलदार, बी.बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी, राजकुमार माहादावाड, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद, जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री. अशोक गिरी, यांची विशेष उपस्थिती होती.

            सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे श्री.शरद कचरे,श्री. हितेंद्र खरात, तालुका क्रीडा अधिकारी, श्री गोकुळ तांदळे, श्री. कृष्णा केंद्रे, क्री.अ,श्रीमती लता लोढे, श्री. गणेश पवार, श्री. सचिन पुरी, क्रीडा मार्गदर्शक,श्री. बी.एस.गोरे, श्री. सदानंद सवळे यांनी सहकार्य केले.