जिल्ह्यातील 17 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब अनुदानास पात्र
प्रकाशन दिनांक : 29/07/2022
औरंगाबाद, दि. 29 (जिमाका) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकूण 17 प्रकरणे ठेवण्यात आली होती, ती सर्व पात्र ठरवण्यात आली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, पोलिस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.