५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध
प्रकाशन दिनांक : 06/10/2020
हरकती, सूचना सात दिवसात सादर करण्याचे आवाहन
औरंगाबाद, दि.05 (जिमाका) :- राज्य सभा आणि राज्य विधान परिषदेसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक २०२० करिता मतदान केंद्राची प्रारूप यादी दि.०६ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदरची यादी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार यांचे कार्यालयात मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदरची प्रारूप यादी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे संकेतस्थळवर तसेच खालील कोष्टकांत नमूद केल्यानुसार सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद विभाग यांचे संकेतस्थळावरदेखील मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
अ.क्र. |
विभाग/जिल्हा |
संकेतस्थळ |
१ |
मा. विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद |
https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/commissioner-office |
२ |
जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद |
|
३ |
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना |
|
४ |
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी |
|
५ |
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड |
|
६ |
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली |
|
७ |
जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर |
|
८ |
जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद |
|
९ |
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड |
मतदान केंद्राच्या प्रारूप यादी संबंधाने हरकती व सूचना ही यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसा पर्यंत (म्हणजेच दि.१३/१०/२०२० पर्यंत) उपरोक्त कोष्टकांत नमूद संबधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कडे सादर करता येतील, असे सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.