बंद

होळी,धुलीवंदनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना जारी

प्रकाशन दिनांक : 27/03/2021

औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता. होळी,धूलिवंदनव रंगपंचमी हे सण यावर्षी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्‍यास बंदी घालण्‍यात येत असल्याचे जिल्हाप्रशासनाने कळविले आहे.“होळी, धूलिवंदन व रंगपंचमी  बाबत सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्‍यात येत आहेत.

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

 

01

1.     कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

 

2.     

02

3.   होळी/शिमगा हा सण यावर्षी सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचे पालन करुन दरवर्षीप्रमाणे साजरा न करता साधेपणाने साजरा करावा.

होळी/शिमगा हा सण साजरा करताना एकत्र येऊन गर्दी करु नये.

03

धूलिवंदन व रंगपंचमी हे सणदेखील साधेपणाने साजरे करावेत, यासाठी प्रशासन, स्‍थानिक लो‍कप्रतिनिधी यांनी  जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

 

होळी व धूलिवंदन या उत्‍सवाच्‍या ठिकाणी मोठया स्‍वरुपाचे धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.

04

4.  स्‍थानिक प्रशासनाने कोणत्‍याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्‍टन्सिंगचे तंतोतंत पालन होईल याबाबत योग्‍य त्‍या उपाययोजना कराव्‍यात.

 

जनतेने स्‍वतःहून मास्‍कचा वापर करावा तसेच सोशल

डिस्‍टन्सिंग व अनुषंगिक नियमांचे उल्‍लंघन करु नये.

05

5.  सर्व जनतेने संदर्भ क्र.2 चे आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.

सदरील आदेशाचे कोणत्‍याही प्रकारे उल्‍लंघन करु नये.