हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार यांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक
प्रकाशन दिनांक : 08/10/2020
औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारा फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलीस आयुक्त शहर औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 31 ऑक्टोबर 2020 चे 24 वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
सदरिल आदेशात नमुद केल्यानुसार हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार 5 ऑक्टोबर पासून पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील मार्गदर्शक सूचनानुसार सुरु केले जातील असे आदेशीत केले आहे. तसेच प्रधान सचिव (पर्यटन विभाग) महाराष्ट्र शासन यांनी याबाबतची सविस्तर मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत. त्या अनुषंगाने आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांनी निर्गमित केलेले आदेश देखील यथास्थित लागू राहतील.
औरंगाबाद जिल्ह्यातील हॉटेल्स/ फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वांचे अवलंब करणे बंधनकारक राहिल. सदरील मार्गदर्शक तत्वे ही सर्व प्रकारच्या उपहारगृहांसाठी (कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, हॉटेल, रिसॉर्टस, क्लब इ.) आणि सर्व बार यांना बंधनकारक असेल. कोव्हीड 19 चा प्रतिबंधक करणे व प्रसार रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे सर्व हॉटेल्स /फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार यांना लागू राहतील.
औरंगाबाद जिल्ह्यातील हॉटेल्स /फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार पुढील आदेशापर्यंत 50% क्षमतेसह चालू राहतील. संबंधीत हॉटेल्स /फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार मधील सर्व कर्मचारी यांची कोव्हीड 019 च्या अनुषंगाने नियमित RTPCR तपासणी करणे बंधनकारक राहील. हे तपासणी प्रमाणपत्र हॉटेल व्यवस्थापकाजवळ निरीक्षणासाठी असणे अनिवार्य आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंबंधी FSSAL (Food Hygiene and Safety Guidelines for Food and Businesses during Corona virus Disease) ने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
हॉटेल कर्मचारी तसेच ग्राहक हे N-95/ तत्सम दर्जाचे मास्कचा वापर करतील याची खात्री करणे. संबंधीत आस्थापनेच्या परिसराचे दिवसातून दोनदा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. शक्य असेल तेथे कोव्हीड 19 चे मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात असल्याबाबतचे CCTV रेकॉर्डीग जतन करुन ठेवावे. सर्व ग्राहकांची शक्यतो प्रवेशव्दारावर कोव्हीड 19 च्या अनुषंगाने तपासणी (Screening-Oxymeter O2, Ther) केवळ लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी. प्रतिक्षालयात तसेच सेवा पुरवितांना सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घातलेल्या ग्राहकांनाचा प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांना हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात यावे. एकदा वापरुन तात्काळ विल्हेवाट लावता येईल अशा पेपर नॅपकिनच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. रेस्टॉरंट मधील दोन टेबल मध्ये किमान 1 मिटर अंतर राहील अशा रीतीने रेस्टॉरंटची पुर्नरचना करावी. रेस्टॉरंट मधील भांडी, क्रॉकरी, कटलरी आदी वस्तु गरम पाण्याने आणि मान्यता प्राप्त निर्जंतुकीकरणाने स्वच्छ करुन यासाठी वॉर्मर वापरावे.
सामाजिक अंतर, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता इत्यादीबाबतीत कर्मचाऱ्यांचे योग्य ते प्रशिक्षण घेण्यात यावे. संबंधीत आस्थापनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या आरोग्याचे स्वंय मुल्यमापन करावे आणि आजाराची काही लक्षणे आढळल्यास यथाशीघ्र वैद्यकीय आस्थापनेशी संपर्क करावा. कामाच्या जागेवर येण्यापूर्वी संबंधीत कर्मचाऱ्यांची तपासणी करुन घ्यावी. स्वयंपाकघरातील व इतर कर्मचाऱ्यांनी फेस मास्क, शेफ कॅप, फेस शिल्ड इत्यादी प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा. सर्व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन तापमान व इतर लक्षणांच्या नोंदी ठेवाव्यात. खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे आढळून आल्यास त्याची योग्य त्या नोंदी ठेवाव्यात. कोणत्याही कर्मचाऱ्यास श्वसन, तापाचे संबंधीत काही तक्रार आढळून आल्यास त्यांचे ताबडतोब अलगीकरण करावे आणि तात्काळ स्थानिक प्रशासनाशी, आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. आस्थापनेमध्ये एखादा कोविड 19 चाचणी सकारात्मक रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण परिसराची सखोल स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. प्रधान सचिव (पर्यटन विभाग) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक राहील,असे सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.