बंद

सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याबाबत आवाहन

प्रकाशन दिनांक : 26/08/2020

औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार यांनी त्यांचे सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याविषयी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार  ज्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल नोंदणी अद्ययावत केली नाही व आधारकार्ड सेवा योजन कार्ड सोबत संलग्न केलेले नाही त्यांनी प्रोफाईल नोंदणी दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अद्ययावत करून घ्यावी. त्यानंतर ज्यांनी प्रोफाईल नोंदणी अद्ययावत केलेली नाही त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आपली प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी क्रमांक व पासवर्डने लॉग ईन होऊन आधार संलग्न करून व इतर माहिती भरून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावी. तसेच काही अडचणी आल्यास या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0240-2334859 वर किंवा या कार्यालयाचा aurangabadrojgar@gmail.com या ईमेलवर अधिक माहिती करीता संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त एन.एन. सुर्यवंशी यांनी केले आहे.