बंद

सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ नवीन खाते उघडण्याची विशेष मोहीम

प्रकाशन दिनांक : 18/09/2020

औरंगाबाद, दि. 18 (जिमाका):- सुकन्या समृद्धी योजना व पी. पी. एफ नवीन खाते उघडण्याची विशेष मोहीम औरंगाबाद व जालना जिल्हयातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा किंवा अधिक माहितीसाठी 0240-2334885 या क्रमांकावर संपर्क करावा.

          नागरिकांनी मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि उज्ज्वल भविष्याकरिता त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जी शिव नागाराजू, प्रवर डाक अधीक्षक, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्यावतीने करण्यात आले आहे.