‘सिमी’च्या सदस्यांना नोटीस बजावण्याचे आदेश
प्रकाशन दिनांक : 05/04/2019
औरंगाबाद,दि. ०३ (जिमाका) – अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम १९६७ चे कलम ३ मधील तरतुदीनुसार सिमी संघटनेस अवैध संघटना घोषित करण्याबाबत कार्यवाहीची सुनावणी मा. न्यायाधिकरणासमोर चालू असल्याने या संघटनेच्या सर्व सदस्यांना सदर संघटनेस अवैध (बेकायदेशीर) का घोषित करण्यात येऊ नये याबाबत खुलासा या प्रकरणातील पुढील तारीख १५ एप्रिल २०१९ पूर्वी सादर करण्याबाबत नोटीस तामिल करण्याबाबत निर्देशित केले आहे.
सिमी संघटनेच्या कारणे दाखवा नोटीसची बजावणी संघटनेच्या सदस्यावर व्यक्तीश: रजिस्टर पोस्ट व स्पीड पोस्टव्दारे बजावण्यात यावी. सदर नोटीसची प्रत सिमी संघटनेच्या औरंगाबाद स्थित कार्यालयात डकवण्यात येवून त्याबाबतचे फोटोग्राफर व पंचनामा तात्काळ ३ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
कार्यवाहीचा पोलिस अहवाल न्यायाधिकरणाकडे सादर करावयाचा असल्याने कार्यालयामार्फत सर्व संबंधित सदस्यांना कारणे दाखवा नोटीसची बजावणी करून संघटनेच्या कार्यालयात नोटीस बजावून त्याबाबतची तामिल प्रत, पंचनामा, फोटोग्राफ जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसांत सादर करावा. जेणेकरून या कार्यालयास न्यायाधिकरणाकडे शासन पत्र दिनांक १४/०३/२०१९ मधील शासन निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीबाबतचे शपथपत्र दाखल करणे सोयीचे होईल असेही श्री. चौधरी यांनी म्हटले आहे.
*****