बंद

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 11/02/2021

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने महानगरपालिका कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. औरंगाबाद महानगरपालिका कार्यालय येथे आगमन. सकाळी 10.15 ते 11.45 पर्यंत औरंगाबाद महानगरपालिकाअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकासकामांचा आढावा. सकाळी 11.45 वा. महानगरपालिका कार्यालय, औरंगाबाद येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 12 ते 2 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकासकामांचा आढावा. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 2 ते 2.15 वा. पत्रकार परिषद. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 2.15 ते 3 पर्यंत राखीव. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 3.15 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव.

दुपारी 4.30 वाजता बालाजी नगर, सिंधी कॉलनी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन. सायं. 5. वा. फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांच्या शासकीय क्रीडा संकुल येथील कार्यालयास भेट. सायं. 5.30 वा. आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयास भेट. सायं 7.40 वा.  शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.