बंद

सामाजिक न्याय भवनला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट

प्रकाशन दिनांक : 02/06/2021

औरंगाबाद, दिनांक 2 (जिमाका) : खोकडपुरा येथील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयास व विविध महामंडळाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शेख जलील, सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांच्याशी चर्चा केली.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासाठी आवश्यक असलेल्या जागेसंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सामाजिक न्याय भवनातील जागेची पाहणी श्री. चव्हाण यांनी केली . यावेळी‍ जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांचीही उपस्थिती होती.

 

सामाजिक न्याय भवनला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट