बंद

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आज शुभारंभ

प्रकाशन दिनांक : 09/12/2020

औरंगाबाद दि. 08 (जिमाका) – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील सभागृहामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.