बंद

समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

प्रकाशन दिनांक : 18/01/2022

औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये (पोकरा) एक हजार 175 नवीन गावांचा समावेश झाल्याची यादी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या यादीच्या सत्यतेबाबत कृषी ‍विभागाकडे सतत विचारणा होत आहे. सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. पोकरामध्ये नव्याने कोणत्याही गावांची निवड झालेली नाही. ‍जिल्ह्यात पूर्वी निवडलेल्या 406 गावांमध्ये कोणतीही भर पडली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.