श्रीसंत जनार्धन स्वामी पुण्यतिथीनिमित्त यात्रेबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचना
प्रकाशन दिनांक : 07/01/2021
औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका): शासन निर्देश व कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दौलताबाद किल्ला येथे 09 जानेवारी रोजी श्रीसंत जनार्धन स्वामी पुण्यतिथीनिमित्त गर्दी करुन यात्रा भरु नये. भाविक सामाजिक अंतरासह दर्शन करू शकतील, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्राव्दारे त्यांना कळविले आहे.