• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन अथवा विक्रीस प्रतिबंध

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिघाच्या आत तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस प्रतिबंधबाबत निर्देश देणारे फलक लावण्याच्या निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी संबधिताना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव एस.व्ही. कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पी.एस.अजिढेंकर,पोलीस अधिक्षक ग्रामीणचे सहाय्यक (गुन्हे शाखा) चे विजय पवार, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.आकाश कासलीवाल आदीची उपस्थिती होती.

यावेळी श्री.जाधवर यांनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये हे तंबाखूमुक्त होण्याच्या अनुषंगाने कार्यालयाच्या दर्शनी भागात धुम्रपान निषेध फलक व तंबाखूमुक्त कार्यालय अशा आशयाचे फलक लावण्यात यावे.तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदयातंर्गत पान मसाला,गुटखा, पदार्थाच्या सेवनास/थुंकण्यास प्रतिबंध करूया साठी संबधित कार्यालयात या कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी व अभ्यागत यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या.

तसे तालुक्यातील समन्वय समिती व तालुकास्तरीय अंमलबजावणी पथक गठीत करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांना यावेळी दिले. तर प्रभावी अंमलबजावणी करीता तालुका स्तरीय समन्वय समितीच्या नियमित बैठकीचे आयोजन गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत करण्याच्या सूचना देखील बैठकीत देण्यात आल्या.