बंद

‘शिवभोजन’चा लाभ घेण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 22/06/2021

औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) : जिल्ह्यातील 24 शिवभोजन भोजनालयात गरीब, गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येते. 14 जुलैपर्यंत शिवभोजन थाळी पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्‍ध आहे. त्यामुळे गरीब व गरजू व्यक्तींनी शिवभोजनाच्या नि:शुल्क लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केले आहे.