शिवजयंती साजरी करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना
प्रकाशन दिनांक : 16/02/2021
औरंगाबाद, दिनांक- 16 (जिमाका) : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्हयासाठी (पोलिस आयुक्त(शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणा-या “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.
अ.क्र. |
काय करावे |
काय करु नये |
01 |
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. |
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये. |
02 |
शिवजयंती उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करावा. |
सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येऊ नये. |
03 |
पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. |
सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. |
04 |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यास सदरील ठिकाणी Social Distancing चे पालन करुन मास्क, सॅनिटायझर इत्यादींचा वापर करावा.
|
प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. |
05 |
आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे उदा.रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्यादवारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. |
उपक्रम शिबिरे राबविताना अशा ठिकाणी लोकांनी एकावेळी मोठया प्रमाणात एकत्रित येऊ नये. |