शिधापत्रिकाधारकांना आवाहन
प्रकाशन दिनांक : 07/08/2020
औरंगाबाद, दि.7, (जिमाका):- कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत शहरातील (अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल, शेतकरी) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना 199 रास्तभाव दुकानामार्फत अन्नधान्याचे वाटप सुरु आहे. कोरोना प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी संसर्ग आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कन्टेंनमेंट झोन तयार करुन त्यामधील नागरिकांना संचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अशा क्षेत्रामधील शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा होणे गरजेचे आहे. तरी त्या क्षेत्रातील नोडल ऑफिसर यांच्याशी समन्वय ठेवून पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्याच्या सुचना रास्त भाव दुकानदारांना देण्यात आले आहेत.
तरी शहरातील पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा होत नसल्यास किंवा अनुषांगिक तक्रार असल्यास त्याबाबतची लेखी तक्रार fgdo2016@gmail.com या ईमेल आयडीवर व mahafood.gov.in व https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर करावी. तसेच पुरवठा निरीक्षक, बबन आवळे- 7020409710, अशोक दराडे -9423953850, प्रदीप राठोड- 7020890831, कविता गिराणे – 9326259079 या पुरवठा निरीक्षक यांच्या भ्रमणध्वनीवर दाखल करावी, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी , औरंगाबाद यांनी केले आहे.