शिकाऊ अनुज्ञप्ती धारकांना पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी आवाहन
प्रकाशन दिनांक : 26/08/2020
औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर माहे मार्च 2020 पासून आर.टी.ओ. कार्यालयातील पक्क्या अनुज्ञप्तीचे प्रलंबित असलेले कामकाज पुर्ण करण्यासाठी कार्यालयामार्फत सध्या असलेला पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा वाढवुन प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु कार्यालयाची सद्याची अपुरी जागा, कार्यालयात होणारी वाहन धारकांची गर्दी व कोरोना विषाणुच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी इत्यादी बाबींचा विचार करता दिनांक 26 ऑगस्ट 2020 पासुन पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज कार्यालयाच्या मौजे करोडी येथिल नविन जागेमध्ये सुरू करावयाचे आहे. सर्व शिकाऊ अनुज्ञप्ती धारकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे मिळालेल्या अपॉइंटमेंटच्या दिवशी पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी सकाळी 9 वाजता मौजे करोडी येथे हजर रहावे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येतांना सक्तीने चेहऱ्यावर मास्क परिधान करावा तसेच सॅनिटायझरचा वापर करावा व चाचणीच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचे (सोशल डिस्टंसिंग) पालन करावे, असे संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) औरंगाबाद यांनी कळविले आहे.