शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करा – रा. अ. रहाटकर
प्रकाशन दिनांक : 03/09/2020
* जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष होणार तयार
औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :- जिल्हा सांख्यिकी कार्यालय, शासकीय कर्मचा-यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वंकष माहितीकोष नोंदणी करण्यारसाठी www.mahasdb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर EMDB-2020 या नावाने ऑनलाईन संगणकीय आज्ञावली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासन वेळापत्रकाप्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी, रा.अ.रहाटकर यांनी केले आहे.
जिल्हा सांख्यिकी कार्यालय,औरंगाबाद यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये माहिती 16 सप्टेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण भरावयाची आहे. तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून दिले जाणारे माहिती नोंदणी केल्याचे प्रथम प्रमाणपत्र माहे डिसेंबर,2020 च्या वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे मार्च,2021 च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा सदर वेतन देयके कोषागार कार्यालय, अधिदान व लेखा कार्यालयाकडून पारीत केले जाणार नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.