बंद

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 03/03/2021

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.