बंद

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 21/10/2020

औरंगाबाद,दि.21 (जिमाका) : औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्हयाच्या  शहरी हद्दीत दिनांक 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.