शहरात कलम 144 (1)(3) अन्वये मनाई आदेश जारी
प्रकाशन दिनांक : 04/11/2020
औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) अन्वये तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, नविन मंत्रालय मुंबई यांच्या अधिसुचना अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) प्रमाणे लागू केलेले मनाई आदेश यापुढे दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू करीत असल्याचे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
यामध्ये कोविड-19 साथ रोगाच्या अनुषंगाने कोणी व्यक्ती/नागरीक यांना सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होईल असे चुकीचे संदेश/माहिती तसेच जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश, ऑडीओ, व्हीडीओ क्लिप यांचे सोशल मिडीयाव्दारे (वॉट्स अप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम इत्यादी) प्रसारण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा. दं. वि 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही असे, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांच्याव्दारा निर्गमित आदेशात नमूद आहे.