बंद

शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करणार – सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 02/11/2020

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : शहरातील रस्त्यांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. शहरातील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे होतील, यादृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेतच, परंतु नागरिकांनीही या कामांकडे लक्ष देण्याचे आवाहन उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती.

लव औरंगाबाद मोहिमेचा शुभारंभ

औरंगाबाद मनपाच्यावतीने औरंगाबाद शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी लव औरंगाबाद मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्याहस्ते सिडको बस स्थानकाजवळ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे आदींची उपस्थिती होती.

शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करणार - सुभाष देसाई