“शब-ए-बारात” बाबत निमित्त मार्गदर्शक सुचना जारी
प्रकाशन दिनांक : 27/03/2021
औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्हयात झपाटयाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. इस्लाम धर्मामध्ये दिनदर्शिकेनुसार येणारा आठवा महीना म्हणजे शाबान. या महिन्याच्या 14 व 15 व्या दिवसाची रात्र ही “शब-ए-बारात” म्हणून ओळखली व साजरी केली जाते. यावर्षी दिनांक 28 मार्च 2021 च्या रात्रीपासून (चंद्र दर्शनावर अवलंबून) ते 29 मार्च 2021 च्या पहाटे पर्यंत हा सण साजरा होणार आहे.
कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
कोरानाचा प्रार्दुभाव अदयापही कमी झालेला नसून सध्या राज्यात व शहरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
त्या अनुषंगाने “’शब-ए-मेराज” व “’शब-ए-बारात” हा सण यावर्षी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळवले आहे.
शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार “’शब-ए-मेराज” व “’शब-ए-बारात” बाबत सर्व मुस्लिम बांधवांनी सण साजरा करताना काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अ.क्र. |
काय करावे |
काय करु नये |
01 |
13. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. |
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये.
|
02 |
14. “’शब-ए-बारात” निमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज, कुराण व दुवा पठण शक्यतो घरीच राहून करावे. |
नमाज, कुराण व दुवा पठण करण्यासाठी मशिदीत कोणत्याही प्रकारे गर्दी करु नये, हे पठण घरीच करावे. |
03 |
हा सण साजरा करताना काही ठिकाणी “वाझ” या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या संसर्गजन्य परीस्थितीचा विचार करता दिनांक 28 मार्च रोजीची रात्र व दिनांक 29 मार्च 2021 ची पहाट या कालावधीत (चंद्र दर्शनावर अवलंबून) येणा-या “’शब-ए-बारात” निमित्त साधेपणाने मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करावे. |
कोविड-19 च्या संसर्गजन्य परीस्थितीचा विचार करता दिनांक 28 मार्च रोजीची रात्र व दिनांक 29 मार्च 2021 ची पहाट या कालावधीत (चंद्र दर्शनावर अवलंबून ) येणाःया “’शब-ए-बारात” निमित्त आयोजित करण्यात येणा-या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यातो करु नये. |
04 |
15. स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणा-या मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारे गर्दी न करता एकावेळी 40 ते 50 व्यक्तींनी फक्त टप्प्या-टप्प्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन व मास्कचा वापर करुन दूवा पठण करावे. |
“’शब-ए-बारात” निमित्त कोणत्याही प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर व इतर ठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करु नये. |
05 |
16. मशिद व्यवस्थापक यांनी मशिद आणि त्या आजूबाजूच्या परीसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायजर इ.) याकडे विशेष लक्ष द्यावे. |
भाविकांनी स्वतःहून मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग व अनुषंगिक नियमांचे उल्लंघन करु नये. |
06 |
17. “’शब-ए-बारात” च्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शकयाते बंदीस्त जागी करावे. वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इ.द्वारे उपलब्ध करुन द्यावी. 18. |
“’शब-ए-बारात” च्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजन खुल्या जागेत करु नये. |
*****