बंद

वैद्यकीय सवलतीचे १८ अर्ज मान्य

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दिनांक ३० – लोकसभा निवडणुकीत वैद्यकीय कारणास्तव कामगिरी नको, अशी विनंती जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रशासनाकडे  केली होती. यामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश होता.

जिल्हा प्रशासनाने त्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून अर्ज धारकांना वैद्यकीय मंडळाकडे पाठविले,  मंडळाकडे प्राप्त 75 प्रकरणातील 18 विनंती अर्ज मान्य असल्याचे मंडळाने प्रशासनाला सांगितले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिली.

*****