बंद

विभागीय लोकशाही दिन 11 फेब्रुवारी रोजी

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

औरंगाबाद,दि. ६ (जिमाका) –विभागीय स्तरावरील लोकशाही दिन येत्या ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी ज्यांनी विहित मुदतीत व विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर केले असतील अशा नागरिकांनाच ११ फेब्रुवारी २०१९ रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. ज्यांनी यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील, परंतु त्यांच्या प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही.

तसेच त्याच दिवशी लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय स्तरावरील विभागीय महिला लोकशाही दिन ११ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आला आहे असे, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.