विभागीय लोकशाही दिनी 4 अर्जांवर सुनावणी
प्रकाशन दिनांक : 12/02/2019
औरंगाबाद दि. 11 (जिमाका) –विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात एकुण 4 अर्ज दाखल झाले असून या सर्व अर्जावर सुनावणी करण्यात आली.
या लोकशाही दिनात मनपा आयुक्त औरंगाबाद – 1, जिल्हाधिकारी बीड – 1, जिल्हाधिकारी जालना – 1,विशेष पोलीस महानिरिक्षक, औरंगाबाद – 1 अशा एकुण चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. प्राप्त प्रकरणांमध्ये सर्व संबंधित विभागांनी तत्परतेने नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी उपायुक्त सूर्यकांत हजारे, अपर जिल्हाधिकारी पी.एल सोरमारे, माहिती संचालक यशवंत भंडारे यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
*****