बंद

विनामास्क बैठकीस उपस्थित राहणाऱ्यांना जिल्हाधिका-यांनी केले दंडित

प्रकाशन दिनांक : 26/08/2020

औरंगाबाद,दि.25(जिमाका)-  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणा-यांना  500 रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला.

सदरच्या आदेशाचे पालन होत आहे का नाही यावर स्वत: जिल्हाधिकारी लक्ष ठेवुन आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असणा-या वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे, या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच ज्ञानेश्वर त्रिभुवन या अभ्यागतास मास्क परीधान न केल्यामुळे प्रत्येकी 500 रुपये दंड आकारुन एक मास्क जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.