बंद

वित्त, नियोजन मंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांचा दौरा

प्रकाशन दिनांक : 14/08/2020

औरंगाबाद दि. 14 जिमाका –  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, राज्यमंत्री शंभुराज शिवजीराव देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

            शनिवार दि. 15 ऑगस्ट  रोजी सायं. 8. 30 सुभेदारी शासकीय विश्रामगृह , औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम.

             रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक उपस्थिती, स्थळ: जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, औरंगाबाद. सकाळी 11.30 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन विभागाची आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 12.30 ते 1 पर्यंत पत्रकार परिषद, स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, दुपारी 1 ते 1.30 पर्यंत राखीव. दुपारी 1.30 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने अहमदनगरकडे प्रयाण.